
PSU Stocks | कोचीन शिपयार्ड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने 1,376.90 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( कोचीन शिपयार्ड कंपनी अंश )
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी कोचीन शिपयार्ड स्टॉक 2.17 टक्के वाढीसह 1,355 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, कोचीन शिपयार्ड स्टॉक दैनंदिन चार्टवर तेजीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, कोचीन शिपयार्ड स्टॉकमध्ये 1,260 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. किंचित तेजीनंतर या स्टॉकमध्ये प्रॉफिट-बुकिंग पाहायला मिळू शकते. शेअर बाजारातील तज्ञांनी कोचीन शिपयार्ड स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1,250 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, कोचीन शिपयार्ड स्टॉक पुढील काळात 1,450 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. दैनंदिन चार्टवर या स्टॉकमध्ये 1,432 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 1,258 रुपये किमतीच्या खाली आला तर शेअर 1,046 रुपये किमतीवर येऊ शकतो.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, कोचीन शिपयार्ड स्टॉकमध्ये 1,255 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 1377 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 1,450 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. पुढील एका महिन्यासाठी कोचीन शिपयार्ड स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 1,200 रुपये ते 1,450 रुपये दरम्यान असेल. कोचीन शिपयार्ड कंपनीच्या प्रवर्तकानी या कंपनीचे 72.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.