15 December 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BCL Industries Share Price | शेअरची किंमत 72 रुपये! 500% परतावा देणाऱ्या शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट आली

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 541 अंकांच्या घसरणीसह 70,500 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 147 अंकांच्या घसरणीसह 21306 अंकावर ट्रेड करत होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील टॉप गेनर्स स्टॉकमध्ये बजाज ऑटो, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि कोल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील होते. तर टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, सन फार्मा आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

गुरुवारी शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना देखील बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. काही वेळात या कंपनीच्या शेअर्सने 73 रुपये किंमत स्पर्श केली होती. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1930 कोटी रुपये होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 37.57 रुपये होती. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5.85 टक्के वाढीसह 72.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 51 टक्के वाढली आहे. 28 मार्च 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 38 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 95 टक्क्यांनी वाढला आहे. 5 मार्च 2021 रोजी BCL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांकी किंमत पातळीवरून हा स्टॉक 500 टक्के वाढला आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 4 मार्च 2023 रोजी 54.6 लाख परिवर्तनीय वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. कंपनीने हे वॉरंट 360 रुपये किमतीवर जारी केले होते. मागील वर्षी 27 ऑक्टोबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित केले होते. त्यामुळे हे वॉरंट शेअर्स 10 शेअर्समध्ये रूपांतरीत केले जात आहेत.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला कळवले की, 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअर्सच्या स्वरूपात हे वॉरंट 36 रुपये किमतीच्या पेड अप शेअर्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. त्यामुळे कंपनीला भरघोस भांडवल उभारण्याची संधी मिळणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price NSE Live 27 January 2024.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x