 
						Puravankara Share Price | पूर्वांकारा लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूर्वांकारा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.7 टक्के वाढीसह 251.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( पूर्वांकारा लिमिटेड कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. येस बँक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना अल्पावधीत 87 टक्के नफा कमावून देऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर 452 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी पूर्वांकारा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14.58 टक्के वाढीसह 281.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये पूर्वांकारा लिमिटेड कंपनीचा सेल्स 20 टक्के CAGR दराने वाढेल. आणि कंपनीचे कर्ज कव्हरेज देखील नियंत्रणात राहील. मजबूत ट्रॅक रेकॉर्ड, पुढील 5-7 वर्षांमध्ये मजबूत नफा कमाईची अपेक्षा, आणि नवीन CEO च्या नियुक्तीच्या बातम्या हे काही ट्रिगर स्टॉक वाढीचे संकेत देत आहेत.
2024 या वर्षात पूर्वांकारा लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मार्च 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 12.13 टक्के वाढले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 8.12 टक्के घसरले होते. एप्रिल महिन्यात अवघ्या काही दिवसात हा स्टॉक 18 टक्के वाढला आहे.
जानेवारी 2024 मध्ये पूर्वांकारा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमावून दिला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 269.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 72.50 रुपये होती. पूर्वांकारा लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 5,762.74 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		