
Quick Money Shares | मागील आठवड्यातील ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. संपूर्ण आठवडाभर भारतीय इक्विटी मार्केटमधील सर्व इंडेक्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. स्मॉलकॅप शेअरमध्ये किंचित प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली. काही शेअर्सनी एका आठवड्यात गुंतवणुकदारांना दुहेरी अंकी परतावा कमावून दिला होता. आज या लेखात आपण स्मॉलकॅप आणि मिडकॅप सेगमेंटमधील भरघोस परतावा देणारे स्टॉक पाहणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के पेक्षा नफा कमावून दिला आहे.
स्मॉलकॅप स्टॉक परतावा :
मागील एका आठवड्याभरात लॉयड्स इंजिनिअरिंग कंपनीच्या स्टॉकने लोकांना 44.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. यानंतर Digispice Technologies कंपनीच्या स्टॉकने देखील एका आठवड्याभरात गुंतवणुकदारांना 40.04 टक्के नफा कमावून दिला आहे. यासह एमपीएस स्टॉकने लोकांना 37 टक्के नफा कमावून दिला आहे. तर Optiemus Infracom कंपनीच्या शेअरने देखील लोकांना 28.7 टक्के परतावा कमावून दिला आहे.
एका आठवड्यात गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देणाऱ्या स्टॉकमध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज, डीपीआयएल, संघी इंडस्ट्रीज, एचसीएल इन्फोसिस्टम्स सारख्या अनेक स्मॉलकॅप स्टॉक चे नाव सामील आहे, ज्यानी एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
मिडकॅप स्टॉक परतावा :
मिडकॅप सेगमेंटचा आढावा घेतला तर आपल्याला समजेल की, 3 कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात, IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. लॉरस लॅब कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर IDBI बँकेच्या शेअरने एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे. एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास जेव्हा व्याज तुम्हाला 2 वर्षात मिळतो, तेवढा नफा या बँकिंग स्टॉकने एका आठवड्यात दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.