
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंट्रा-डेमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 400 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 491.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 123.05 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 12,375.38 कोटी रुपये आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश )
आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 7.81 टक्के वाढीसह 414.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस या कंपनीकडून आयसीटीचा पुरवठा, इन्स्टॉलेशन कमिशनिंग आणि इंटिग्रेशनसह इतर अनेक कामे पूर्ण करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 81,45,64,548 रुपये आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीला DRDO कडून देखील 17.21 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे.
मागील एका महिन्यात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 198 टक्क्यांनी वाढवले आहे. मार्च 2024 पर्यंत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीमध्ये भारत सरकारने 72.80 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 22.32 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. FII ने या कंपनीचे 2.2 टक्के आणि MF ने 2.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.