
RailTel Share Price | मागील काही दिवसापासून रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 1 वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, पुढील 10 दिवसांत या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढू शकतात. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 401 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 1.77 टक्के वाढीसह 408.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने पुढील 10 दिवसांसाठी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सवर सट्टा लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 387 रुपये किमतीवर असताना खरेदी करण्याची शिफारस केली होती. त्यावेळी तज्ञांनी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉकवर 418 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा आणि गुंतवणूक करताना 367 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला होता.
मागील 3 ट्रेडिंग सेशनपासून रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. 13 मे रोजी हा स्टॉक 356 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अवघ्या तीन दिवसांत हा स्टॉक 356 रुपयेवरून 401 रुपये किमतीवर पोहचला होता. 28 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 491 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. 14 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 301 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आणि 10 मे 2024 रोजी या स्टॉकने 348 रुपये किंमत स्पर्श केली होती.
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्के वाढली आहे. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीचा स्टॉक फ्लॅट राहिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स फक्त 6 टक्के वाढले आहेत.
2024 या वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉकची किंमत 14 टक्के वाढली होती. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 235 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीचा IPO फेब्रुवारी 2021 मध्ये शेअर बाजारात 94 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.