1 April 2023 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स IRCTC Railway Ticket | अचानक गाव-शहरात ट्रेनने जावं लागतंय अन तिकीट नाही? नो टेन्शन, हा नियम मदत करेल Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा
x

Rama Steel Tube Share Price | परतावा असावा तर असा! या शेअरने 6 महिन्यांत 142% परतावा दिला, बाजार कमजोर पण स्टॉक तेजीत

Rama Steel Tube Share Price

Rama Steel Tube Share Price | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स 2.64% वाढीसह 36.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या ही कंपनी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे, कारण कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकाना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज शेअर बाजरी जबरदस्त पडझड असताना या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price | Rama Steel Tubes Stock Price | BSE 539309 | NSE RAMASTEEL)

आज NSE आणि BSE निर्देशांकावर या कंपनीचे एकूण 2,683,945 शेअर्स ट्रेड झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हा स्टॉक 36 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे. लोह आणि पोलाद उत्पादने करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या जवळ ट्रेड करत आहेत. डिसेंबर तिमाहीमध्ये सर्वाधिक 53,216.16 टन उत्पादने विक्रीचे प्रमाण गाठल्यानंतर शेअर च्या किमतीत वाढ पाहायला मिळाली आहे.

तीन महिन्यांत 74 टक्के परतावा :
25 ऑगस्ट 2022 रोजी रामा स्टील ट्यूब कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याची घोषणा केली होती. कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्समध्ये विभागले होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या स्टॉकने लोकांना 142 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

शंकर शर्मा पोर्टफोलिओ :
12 ऑक्टोबर 2022 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनी संचालक मंडळाने दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांना प्राधान्याच्या आधारावर 112.50 रुपये प्रीमियमसह 16.25 लाख परिवर्तनीय वॉरंट जारी करण्यास मंजुरी दिली होती. वॉरंट वाटप करणाऱ्याला इश्यू किमतीच्या 25 टक्के अधिक रक्कम द्यावी लागली होती. 14 जानेवारी 2023 रोजी ICRA ने रामा स्टील ट्यूब्स इन्स्ट्रुमेंट्स कंपनीला BBB रेटिंग दिले आहेत. ICRA या रेटिंग एजन्सीने रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे व्यवस्थापन आणि स्टील पाईप उद्योगातील दीर्घ ट्रैक रेकॉर्डबद्दल सकारात्मक विचार व्यक्त केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rama Steel Tubes Share Price 539309 RAMASTEEL stock market live on 28 January 2023.

हॅशटॅग्स

Rama Steel Tube Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x