
Raymond Share Price Today | मागील एक महिन्यापासून ‘रेमंड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 1,755.35 रुकाय किमतीवर ट्रेड करत होते. 13 एप्रिल 2023 पासून या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.71 टक्के घसरणीसह 1,617.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनी आणि रेमंड कंपनी यांच्यात ग्राहक सेवा व्यवसायसंबंधित करार करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या चर्चेत ‘पार्क अव्हेन्यू’ या पुरुष ग्रूमिंग ब्रँड आणि कामसूत्र कंडोमबाबत करार करण्याचा विचार केला जात आहे.
जर या दोन्ही कंपनीमध्ये हा व्यापारी करार संपन्न झाला तर, ‘गोदरेज कंझ्युमर’ पुरुषांच्या पर्सनल केअर आणि लैंगिक आरोग्य प्रॉडक्ट मार्केटमधील एक मोठा वाटा काबीज करेल. सिंघानिया कुटुंबाच्या मालकीची रेमंड कंपनी आणि समूह दोन वर्षांपासून आपला पर्सनल केअर व्यवसाय विकण्याचा विचार करत आहे. त्यामुळेच रेमंड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे.
मागील तीन महिन्यांत ‘रेमंड’ कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्क्यांनी वर गेली आहे. 22 एप्रिल 2023 रोजी ‘रेमंड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने के.के नरसिंह मूर्ती यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 5 जानेवारी 2023 रोजी Raymond America Apparel INC अंमेरिकेतील न्यू जर्सी येथे लाँच करण्यात आले आहे. मात्र त्याचे व्यवसाय कार्य अद्याप सुरू झालेले नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.