
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज या औद्योगिक गॅस संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 वर्षात 16,000 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्के वाढली आहे.
मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.69 टक्के वाढीसह 685.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 680.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2013 पर्यंत या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक श्रेणीत ट्रेड करत होते. तेव्हा हा स्टॉक 3 रुपये किमतीवर होता. रेफेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील रेफ्रिजरंट गॅसेसची एक विशेषज्ञ उत्पादक आणि रिफिलर कंपनी म्हणून ओळखली जाते.
रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 53.27 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 46.73 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, म्युच्युअल फंड आणि परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली नाहीये.
सप्टेंबर 2023 च्या तिमाहीमध्ये रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल तिमाही-दर-तिमाही 8 टक्के कमी होऊन 352 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर त्याच तिमाहीत कंपनीचा PAT वाढून 21.43 कोटी रुपये नोंदवला गेला होता. अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक आपल्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा मजबूत कामगिरी करत आहे. हा स्टॉक पुढील काळात 760 रुपये तर 800 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. मात्र गुंतवणूक करताना तज्ञांनी शेअरमध्ये 644 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. GCL ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 750 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.