
Reliance Communications Share Price | रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी निर्माण झाली होती. केंद्र सरकारने 96,317.65 कोटी रुपये मूळ किमतीत मोबाईल फोन सेवांसाठी आठ स्पेक्ट्रम बँडचा लिलाव करण्यास मंजुरी दिली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनी सारख्या दूरसंचार कंपन्यांचे स्पेक्ट्रमही या लिलावात विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. या स्पेक्ट्रमचा कालावधी यावर्षी संपणार आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
दरम्यान, रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. ही सीओसीची ही 45 वी बैठक होती. शनिवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जाणार आहे. आणि चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांचे आर्थिक निकालही जाहीर केले जातील.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 2.45 रुपये किमतीवर पोहचले होते. या आठवड्यात रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2008 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 99 टक्क्यांनी घसरला होता. कंपनीचे प्रवर्तक असलेल्या अनिल अंबानी यांच्या कुटुंबाकडे रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीचे 2 टक्के पेक्षा कमी भाग भांडवल आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.