
Reliance Industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या रिलायन्स रिटेल कंपनीमध्ये कतार गुंतवणूक प्राधिकरण 95 कोटी ते एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. तज्ञांच्या मते या डीलबाबत QIA आणि रिलायन्स रिटेल यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. (RIL Share Price)
कतार मधील ही गुंतवणूक कंपनी रिलायन्स रिटेल कंपनीमध्ये तब्बल 100 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के घसरणीसह 2,515.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कतार गुंतवणूक प्राधिकरण रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा भाग असलेल्या रिलायन्स रिटेलमध्ये तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट मूल्यांकनासह गुंतवणूक करणार आहे. सौदी अरेबियाच्या अरामको गुंतवणूक संस्थेने 2020 मध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड कंपनीमध्ये 1.3 अब्ज डॉलर्स गुंतवणुक करून 2.04 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. हा सौदा तब्बल 62.4 अब्ज डॉलर मुल्यांकनावर झाला होता.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्यूआयएच्या गुंतवणुकीच्या बातमीनंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.51 टक्क्यांच्या वाढीसह 2,547.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या डिमर्जरनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. आता मात्र तज्ञ रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या डिमर्जरनंतर, विविध ब्रोकरेज हाऊस रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 2,950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर बर्नस्टीनने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकसाठी 3,040 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
कोटक इन्स्टिट्यूशन फर्मने RIL स्टॉकवर 2,700 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर नोमुराने या कंपनीच्या स्टॉकसाठी 2,925 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. CLSA ने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकसाठी 3,060 रुपये टार्गेट किंमत दिली आहे. आणि मॉर्गन स्टॅनलीने 3,000 रुपये, Goldman Sachs ने 2,725 रुपये, जेपी मॉर्गनने 3,040 चे लक्ष्य किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बीएनपी पॅरिबस एशियाने देखील रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 2,925 रुपये टारगेट किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.