
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स इन्फ्रा कंपनीचा निव्वळ तोटा वाढून 421.17 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीला 267.46 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स इन्फ्रा कंपनीने 4,717.09 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 4,224.64 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीचा खर्च 5,068.71 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 5.61 टक्के घसरणीसह 201.05 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मार्च 2020 मध्ये रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कोरोना लॉकडाऊन लागल्यामुळे या कंपनीला देखील जबरदस्त फटका बसला होता. यानंतर हळूहळू रिलायन्स इन्फ्रा स्टॉक रिकव्हरीच्या ट्रॅकवर आला आणि शेअरने 200 रुपये किंमत स्पर्श केली होती. 9 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 248 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. ज्या लोकांनी मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2500 टक्के वाढले आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रवर्तक गटाने कंपनीचे 16.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर 83.39 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी होल्ड केले आहे. यामध्ये अनिल अंबानी यांनी वैयक्तिक गुंतवणुकदार म्हणून रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे 1,39,437 शेअर्स होल्ड केले आहेत. याशिवाय अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांनी कंपनीचे 1,23,812 शेअर्स होल्ड केले आहे. तर अनिल अंबानी यांच्या दोन्ही मुलांकडे कंपनीचे 1,25,238 शेअर्स आहेत.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. सध्या ही कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहे. कंपनीवर खूप मोठे कर्जाचे डोंगर असून कंपनी ते परतफेड करण्यास असक्षम ठरली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.