13 December 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Penny Stock | लॉटरीच लागली! खोऱ्यानं पैसा ओढत आहेत, या शेअरवर 1263% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट प्लस फ्री बोनस शेअर्स

Penny Stock

Penny Stock | हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्टार हाऊसिंग फायनान्सने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ही कंपनी आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याच्या तयारीत आहे. कंपनी प्रथम आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करेल, आणि शेअर्स विभाजित करणार आहे. 2022 या वर्षात स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 149 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. 2015 सालापासून आतापर्यंत या स्टॉकने 1263 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर 216.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Housing Finance Share Price | Star Housing Finance Stock Price | BSE 539017)

शेअर किंमतीचा इतिहास :
गृहनिर्माण वित्त पुरवठा क्षेत्रातील या मल्टीबॅगर कंपनीच्या स्टॉकने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 155 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॉकचे मागील सहा महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या कंपनीच्या स्टॉकने लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 61.70 टक्के वाढवले आहेत. 20 मार्च 2015 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरने 1263 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

बोनस शेअर जारी :
कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत दिला जाणार आहे. यासोबतच संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आली आहे. जर समजा तुमच्या शेअर पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे 100 शेअर्स आहेत, तर स्टॉक स्प्लिटनंतर तुमच्या शेअर्सची संख्या 200 होईल. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची वाटप करण्याची रेकॉर्ड डेट 16 डिसेंबर 2022 असेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Star Housing Finance Limited company has Announced Stock split and Bonus Shares to existing shareholders on record date on 09 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x