3 November 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअर्सची घसरण सुरु, मागील 1 वर्षात 300 टक्के नफा देणारा स्टॉक का घसरतोय?

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स अक्षरशः कोसळले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 51 टक्क्यांच्या घसरणीसह 138.97 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 287.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.67 टक्क्यांच्या घसरणीसह 140.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 19.99 टक्के घसरणीसह 112.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सेबीला दिलेल्या माहितीनुसार एसजेव्हीएन कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत 607.72 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 711.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या संचालकांची बैठक पार पडली होती. हा बैठकीत कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 1.15 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

मागील एका महिन्यात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 51 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 153 टक्के वाढली आहे.

मागील एका वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. एसजेव्हीएन कंपनीमध्ये भारत सरकारने 55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर हिमाचल प्रदेश सरकारने या कंपनीचे 26.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 12 February 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x