 
						Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये हालचाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स एकेकाळी 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता 20 रुपयेवर पोहचले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह 20.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
सध्या रिलायन्स पॉवर स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या जवळ ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 22.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 19.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एकेकाळी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 20 रुपये किमतीवर पोहचले आहेत. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.12 रुपये किमतीवर पोहोचले होते.
रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील साडेतीन वर्षांत 1650 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 117 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 9.16 रुपयेवरून वाढून 20.12 रुपयेवर पोहचली आहे.
2023 या वर्षात आतापर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. रिलायन्स कमर्शियल फायनान्स ही कंपनी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये 1043 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपन्या 1043 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहेत. हा सर्व पैसा रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपनीच्या माध्यमातून गुंतवला जाणार आहे.
रिलायन्स कमर्शियल फायनान्स ही कंपनी ऑटम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने प्रेफरंस शेअर्सच्या माध्यमातून रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स कमर्शियल फायनान्स ही कंपनी पूर्वी अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहाचा भाग होती. मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये ऑटम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ती कंपनी खरेदी केली.
रिलायन्स कमर्शियल फायनान्स ही कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये 891 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. आणि रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये 152 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही डील संपन्न झाली की, रिलायन्स कमर्शियल कंपनीकडे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 11 टक्के आणि रिलायन्स पॉवर कंपनीचे 2 टक्के भाग भांडवल येतील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		