 
						Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षांत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबर तोटा दिला होता. मात्र आता अनिल अंबानीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
मागील 3 वर्षांत रिलायन्स पॉवर लिमिटेड स्टॉक 3 रुपयेवरून वाढून 19 रुपयेवर पोहचला आहे. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 20.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील तीन वर्षांत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 545 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 नोव्हेंबर 2020 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.75 रुपये किमतीवर पोहचले होते.
8 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आता हा स्टॉक 62.55 टक्के वाढून 19.75 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या स्टॉकने मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 16.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.64 टक्के नफा कमवून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत रिलायन्स पॉवर स्टॉक 34.35 टक्के वाढला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 14.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 22.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		