
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 23.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील 5 दिवसांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
मागील आठवड्यात रिलायन्स पॉवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएस बँकेचे कर्ज परतफेड केले आहे. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.81 टक्के वाढीसह 25.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स पॉवर कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. सध्या रिलायन्स पॉवर कंपनीवर आयडीबीआय बँकेचे कर्ज आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 2000 टक्के वाढली आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 मार्च 2024 रोजी हा स्टॉक 23.83 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 130 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती.
रिलायन्स पॉवर कंपनीची प्रवर्तक कंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने देखील JC फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची 2100 कोटी रुपये थकबाकी परतफेड करण्याची तयारी केली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 248.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2550 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 20 मार्च 2024 रोजी 248.10 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 264 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.