 
						Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांच्या ऊर्जा क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी ‘रिलायन्स पॉवर’चे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांनी वधारले होते. ट्रेडिंग सेशनदरम्यान ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 12.55 रुपये पर्यंत पोहचले होते. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ या कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के घसरणीसह 12.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात कंपनीचे एकूण भाग भांडवल 4600 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. 28 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअरने 9.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.95 रुपये होती. मागील वर्षी 6 सप्टेंबर 2022 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2008 मध्ये ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Reliance Power Limited)
गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका आठवड्यात ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरच्या किमतीत मागील दोन आठवड्यात 34 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा मागील 3 महिने, 6 महिने आणि एक वर्षाचा परतावा नकारात्मक होता. तथापि मागील दोन वर्षांच्या कालावधीत कंपनीचे शेअर्स 157 टक्क्यांनी घसरले होते. मागील पाच वर्षात या कंपनीचे शेअर्स 69.84 टक्के कमजोर झाले आहेत.
कडक उन्हाळ्याचा फायदा :
सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होताच वीज क्षेत्रातील जवळपास सर्वच शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. वास्तविक या काळात विजेची मागणी अनेक पटींनी वाढते, आणि या वीज कंपन्याच्या शेअरची किंमत देखील वाढते. यामुळेच ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्सही तेजीत आले आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ तोट्यात जबरदस्त वाढ झाली होती. ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचा तोटा डिसेंबर 2022 तिमाहीत 291.54 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च वाढून 2,126.33 कोटी रुपयेवर पोहचला होता. ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचा तोटा 2021 च्या तिमाहीत वार्षिक आधारावर 97 कोटी रुपये नोंदवला गेला होता. त्याच वेळी कंपनीचा तिमाही खर्च 1,900.05 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		