
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह 21.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील साडेतीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 21 रुपयेवर पोहचली आहे. या काळात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1700 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कमर्शियल फायनान्स कंपनीला 20 रुपये प्रति शेअर किमतीवर 7,59,77,000 शेअर्सचे वाटप केले आहे. रिलायन्स कमर्शियल फायनान्स ही कंपनी ऑथम इन्व्हेस्टमेंट्स कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. काल गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के घसरणीसह 20.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.89 टक्के वाढीसह (सकाळी ०९:३० वाजता) 21.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीने न्यायालयाबाहेर कर्ज निराकरण प्रक्रिये अंतर्गत रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. त्यानंतर रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 1775 टक्के मजबूत झाली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील साडेतीन वर्षांत जबरदस्त कामगिरी करून गुंतवणुकदारांना देखील हैराण केले होते.
27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 21.19 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कालावधीत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 1775 टक्के वाढली आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 9.05 रुपये होती. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 81 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर या दोन सूचीबद्ध कंपन्यांमध्ये ऑटोम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी 1043 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर या कंपन्या भांडवलाच्या बदल्यात प्रेफरंस शेअर्स जारी करणार आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स कमर्शियल फायनान्स कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये 891 कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये 152 कोटी रुपयेची गुंतवणूक करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.