Reliance Power Share Price | 13 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूकदारांची मजबूत कमाई होतेय, तेजीचे कारण काय?

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 13.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 12.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 24.95 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती.

4 दिवसात शेअर 21 टक्के वाढला

रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील 4 दिवसात 21 टक्के मजबूत झाले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 22 मे 2023 रोजी 11.42 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 26 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 13.90 रुपये किमतीवर ट्रेड (Reliance Power Share Price NSE) करत होते. मागील एका महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Reliance Power Share Price BSE)

मागील 6 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 14 पडझड पाहायला मिळाली होती. रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 24.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

रिलायन्स पॉवर स्टॉकमधील तेजीचे कारण

रिलायन्स पॉवर कंपनीने आपल्या कर्जदारांना उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या कर्जाची पुर्तता करण्यासाठी 1200 कोटींची वन टाइम सेटलमेंट ऑफर दिली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बैंक, बैंक ऑफ बड़ोदा, PNB, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, या कर्जदारांना 1,200 कोटी रुपयांची अपफ्रंट रोकड देऊन कर्ज फेडीची ऑफर दिली आहे. 31 मार्च 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनीच्या डोक्यावर 2200 कोटी रुपये कर्ज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share price today on 27 May 2023.