
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना रिलायन्स पॉवर स्टॉक तेजीत धावत होता. मात्र आज शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग झाली आहे.
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेवटच्या काही तासात हा स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 16.51 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3.32 टक्के घसरणीसह 16.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
रिलायन्स पॉवर कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. मे 2008 मध्ये या कंपनीचे शेअर 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरचा लिलाव 8 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. 8 ऑगस्ट रोजी तीन मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांमध्ये स्विस चॅलेंज लिलाव आयोजित करण्यात आला आहे. कंपनीच्या लिलावात बोली लावणाऱ्यामध्ये आदित्य बिर्ला ARC, Avenue Capital backed Asset Reconstruction Company of India, आणि Reliance ARC यांची निवड करण्यात आलेली आहे
मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 29.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आल्या गुंतवणुकदारांना 13.88 टक्के परतावा कमावून दिला आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जून 2023 तिमाहीत प्रवर्तकांनी कंपनीचे 24.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर कंपनीचे 75.01 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे. अनिल अंबानी यांच्या कुटुंबाकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे 9312,62,920 शेअर्स आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.