 
						Reliance SBI Card | एसबीआय कार्ड आणि रिलायन्स रिटेल यांनी संयुक्तपणे नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. ‘रिलायन्स एसबीआय कार्ड’ असे या कार्डचे नाव आहे. हे कार्ड रिलायन्स एसबीआय कार्ड आणि रिलायन्स एसबीआय कार्ड प्राईम या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कार्डरिलायन्स रिटेल इकोसिस्टम असलेल्या स्टोअरमध्ये पेमेंट केल्यास उत्तम फायदे आणि रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. दोन्ही कार्डवर वेगवेगळ्या ऑफर्स मिळणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर…
रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्ड यांनी ग्राहकांना विशेष लाभ देण्याच्या उद्देशाने भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत रिलायन्स रिटेलचे ग्राहक एसबीआय कार्डच्या विस्तृत नेटवर्कचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना एक्सक्लूसिव्ह ट्रॅव्हल आणि एंटरटेनमेंट बेनिफिट्स सारखे विविध फायदे मिळतात.
रिलायन्स एसबीआय कार्ड शुल्क
रिलायन्स एसबीआय कार्डची जॉइनिंग फी 499 रुपये आहे, ज्यात कराचा समावेश नाही. तर, वार्षिक शुल्क 499 रुपये + टॅक्स आहे. 1 लाख खर्च केल्यास वार्षिक शुल्क आकारले जाणार आहे. वेलकम ऑफरअंतर्गत रिलायन्स रिटेल व्हाउचर ५०० रुपयांचे मिळणार आहे. रिलायन्स ब्रँडसाठी 3200 रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर मिळणार आहे. या कार्डसोबत लाउंजबेनिफिट्स मिळणार नाहीत.
रिलायन्स एसबीआय कार्ड प्राईमचे शुल्क
रिलायन्स एसबीआय कार्ड प्राईमचे जॉईनिंग फी 2999 रुपये + कर आहे. याशिवाय वार्षिक शुल्कही तेवढेच आहे. तीन लाख रुपये खर्च करून वार्षिक शुल्क आकारले जाणार आहे. वेलकम ऑफर अंतर्गत रिलायन्स रिटेल व्हाउचर 3000 रुपये मिळणार आहे. रिलायन्सच्या विविध ब्रँडसाठी 11,999 रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर मिळणार आहे. या कार्डवर 8 डोमेस्टिक आणि 4 इंटरनॅशनल एअरपोर्ट लाउंज बेनिफिट्स मिळणार आहेत. दरमहा २५० रुपयांचे मोफत चित्रपट तिकीट मिळणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		