
Reliance Share Price | जागतिक स्तरावरील नकारात्मक घडामोडींमुळे शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 1.45% घसरून 2,773 रुपयांवर (NSE: Reliance) बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली बंद झाला होता. मात्र या प्रचंड घसरणीमुळे निर्देशांकही घसरला आणि शेअर बाजारातील घसरण अधिकच वाढली होती. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
शेअर उच्चांकी पातळीवरून 14 टक्क्यांहून अधिक वाढला
विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड साठी ही एक मोठी घसरण होती. शुक्रवारी, 04 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर 1.45 टक्क्यांनी घसरून एनएसईवर 2,773 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर 52 आठवड्यांच्या 3,217.60 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून 14 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज चार्ट पॅटर्न – तज्ज्ञांचे संकेत
या संदर्भात शेअर बाजार तज्ज्ञ सांगतात की, “रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचा मागील इतिहास तपासून पाहिल्यास हा शेअर 40 टक्क्यांनी घसरला होता. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून विचार केल्यास हा शेअर जवळपास 4% घसरला होता. अगदी ताजी घटना म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी हा शेअर जवळपास ४% घसरला होता.
तसेच तीन – चार वर्षांची आकडेवारी पाहिली, तर हा शेअर दोन प्रकारे हालचाल करतो असं पाहायला मिळालं आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे 4 टक्के करेक्शन झाल्यानंतर हा शेअर आणखी 2-5 टक्क्यांनी खाली घसरतो. त्यामुळे मागील इतिहास पाहता हा शेअर पुढील काही दिवसात आणखी दोन ते पाच टक्क्यांनी घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मात्र त्यानंतर सकारात्मक बाजूची आकडेवारी अशी आहे की, पुढील 10 दिवसांच्या मॅट्रिक्सवर, ज्या दिवशी स्टॉक 4 टक्क्यांनी घसरतो, नेमका त्याच दिवसापासून हा शेअर सरासरी 5 टक्क्यांच्या मार्जिनने अधिक रिकव्हरी होतो. तज्ज्ञ पुढे सांगतात की, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 4% घसरणीनंतर प्रत्येक वेळी जे काही घडले आहे, त्या प्रत्येक वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने पुढील 10 दिवसांत सरासरी 5% परतावा दिला आहे.
दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2 ते 3 टक्क्यांनी अधिक करेक्शननंतर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण गुंतवणूकदारांना जोखीम अधिक फायदेशीर ठरेल. कारण या पॉइंटला रिलायन्स शेअरमध्ये एंट्री घेताना 2,750 रुपये म्हणजे 5 ते 7 टक्के व्ही-शेप रॅली मिळू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.