30 April 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग कायम ठेवली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बेस केसवर 1,215 रुपये टार्गेट प्राईस ठेवली आहे. मात्र बुल केसमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 55 टक्क्यांनी वाढून 1,930 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शेअरमधील मागील कामगिरी आणि अलीकडील घसरण

गेल्या वर्षांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर्स व्यापक बाजार निर्देशांकांपेक्षा कमी कामगिरी करत आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने नकारात्मक परतावा दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या 10 वर्षांतील इतिहासात हे प्रथमच घडलं आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मच्या मते, रिलायन्स रिटेल कंपनीतील विकासदर कमी होणे आणि रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल मार्जिन कमकुवत असणे हे नकारात्मक कामगिरीतील मुख्य कारण आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअरमध्ये 19.15 टक्क्यांची मोठी घसरण झाल्यानंतर ब्रोकरेज फर्मला कंपनीच्या आगामी वाटचालीबद्दल आणि योजनांवर विश्वास आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचे सध्याचे मूल्यांकन त्याच्या बिअर (मंदी) केसवर आधारित आहे. विशेष म्हणजे रिलायन्स जिओचे मूल्यांकन भारती एअरटेलच्या सध्याच्या मूल्यापेक्षा १० टक्क्यांनी कमी असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. पुढील तीन वर्षांत कोअर रिटेल रेव्हेन्यू आणि एबिटडा मध्ये उच्च-एकअंकी वाढीचा अंदाज ब्रोकरेजने वर्तवला आहे, मात्र ओ२सी (ऑईल-टू-केमिकल्स) उत्पन्नात कोणतीही सुधारणा दिसून आलेली नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

विश्लेषकांचे मत आणि शेअरची सध्याची प्राईस

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरवर नजर ठेवणाऱ्या ३८ विश्लेषकांपैकी ३४ विश्लेषकांनी खरेदीचा सल्ला दिला आहे, तर एका विश्लेषकाने ‘HOLD’ आणि तीन विश्लेषकांनी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. तसेच मिरे असेट्सट सिक्युरिटीज ब्रोकरेजने सर्वाधिक म्हणजे 1,950 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Monday 27 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या