
Reliance Share Price | मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स गृप या भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries Share Price) ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा स्पर्श केला होता. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा संपूर्ण रिलायन्स समूहाच्या एकूण बाजार भांडवलात 90 टक्के वाटा आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.50 लाख कोटी रुपये आहे. विलगीकरण प्रक्रियेअंतर्गत जिओ फायनान्शियल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीमधून वेगळी झाली होती. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.17 टक्के वाढीसह 2,681.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले आहेत. रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या इतर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 50 हजार कोटींपेक्षा कमी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सबाबत अनेक तज्ञ सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 3,050 रुपये स्पर्श करू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक अल्पमुदतीत 3,050 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 2821 रुपये स्पर्श करू शकतो. याशिवाय जेफरीज फर्मच्या तज्ञांनी देखील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीज फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 3,125 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज रिलायन्स कंपनीचे शेअर्स 2,681.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 13 टक्के EBITDA वाढ नोंदवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची टेलिकॉम उपकंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिओ कंपनीचे टॅरिफ वाढल्यामुळे रिलायन्स गृपला फायदा झाला आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 2,730 रुपये तर 2,850 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.