
Repro India Share Price | ‘रेप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी रेप्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 619.70 रुपये किमतीवर ट्रेड (Repro India Share Price NSE) करत होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. मागील एका आठवड्यात ‘रेप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Repro India Share Price Today)
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार ‘माधुरी केला’ यांनी नुकताच ‘रेप्रो इंडिया’ कंपनीचे 3 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारातून खरेदी केले आहेत. ‘रेप्रो इंडिया’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, माधुरी मधुसूदन केला आणि ब्रिज किशोर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड फर्मने रेप्रो इंडिया कंपनीचे 4,75,000 शेअर्स खरेदी केले आहे. या शेअर्सचे प्रमाण 3.59 टक्के टक्के आहे. या गुंतवणुकीनंतर रेप्रो इंडिया कंपनीमधील त्यांचा एकूण वाटा 6.89 टक्केवर पोहचला आहे.
रेप्रो इंडिया कंपनीचा शेअर शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी 2.18 टक्क्यांच्या वाढीसह 601.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी रेप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना 48 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. (Repro India Share Price BSE)
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.