 
						RKEC Projects Share Price | आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड या नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणास्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 90.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर 80.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19,360.41 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के वाढीसह 83.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला अंदमान आणि निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर येथे 330 एमटीआरएस लांबीच्या सीजी जेट्टीवर जेट्टी फेंडर्सच्या दुरुस्तीचे काम देण्यात आले आहेत. हा प्रकल्प 12 महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कंपनीला कोची एलएनजी टर्मिनलवर TLF स्किडच्या स्थापनेचे देखील काम देण्यात आले आहे, ज्याचे एकूण मूल्य 21,17,71,992 रुपये आहे.
आता या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, RKEC प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला 26.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, आरकेईसी-सूर्यदेवरा जॉइंट व्हेंचरला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. आणि हा प्रकल्प पुढील 9 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
जून 2023 तिमाहीत आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने 17 टक्के वाढीसह 46.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 38.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात देखील 287 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर जून 2023 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 0.72 कोटींवरून वाढून 2.79 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
RKEC प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रवर्तकांनी 73.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 26.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी पायाभूत सुविधांचा विकास आणि बांधकाम संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. आरकेईसी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी व्यवसाय महामार्ग, रस्ते आणि पूल बांधण्याच्या कामात तज्ञ मानली जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		