
RVNL Share Price | मागील वर्षभरात स्टॉक मार्केटमधील अनेक शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. पीएसयू आरव्हीएनएल शेअरने सुद्धा गेल्या वर्षभरात मोठी परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने 205 टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या १ महिन्यात हा शेअर 7.73% घसरला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये विक्रमी उच्चांकी पातळीवरून 27 टक्क्यांहून मोठी सुधारणा झाली आहे. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी शेअरने 28 ऑक्टोबर रोजी 408 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. मात्र मागील ४ सत्रांमध्ये RVNL शेअर तेजीत आहे. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 98,194 कोटी रुपये आहे.
शेअर उच्चांकी पातळी गाठणार
आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 10-दिवस, 20-दिवस, 50-दिवस आणि 100-दिवसांच्या एसएमएच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे. RVNL शेअरबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, “लॉन्ग टर्मच्या दृष्टीकोनातून, RVNL शेअर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा शेअर पुढे मोठा परतावा देऊ शकतो.
मल्टिबॅगर शेअर
मागील ६ महिन्यात या शेअरने 62.75% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 205.16% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,747.15% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.