
RVNL Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. सकाळच्या सत्रात घसरलेला शेअर बाजार बंद होताना मात्र सुसाट तेजीत आल्याचं पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आपल्या नीचांकी पातळीपेक्षा जवळपास 2000 अंकांनी वाढला होता. तसेच शेअर बाजार निफ्टी मजबूत होऊन त्याने २४७५० चा टप्पा ओलांडला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट बंद होताना बीएसई सेन्सेक्समध्ये 850 अंकांची जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
तज्ज्ञांचा आरव्हीएनएल शेअर खरेदीचा सल्ला
स्टॉक मार्केट तज्ज्ञ तेजस शाह यांनी आरव्हीएनएल शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तेजस शाह यांनी आरव्हीएनएल शेअर अतिशय मजबूत शेअर असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा शेअर 466.50 रुपयांवर ट्रेड करतोय. जुलैमध्ये आरव्हीएनएल शेअरने ६४७ रुपयाचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर शेअर्समध्ये प्रचंड घसरला होता.
आरव्हीएनएल शेअर सपोर्ट लेव्हल
पण अलीकडेच आरव्हीएनएल शेअरने ४१०-४२० रुपयांवर सपोर्ट तयार केला आहे. इथून आरव्हीएनएल शेअरमध्ये रॅली पाहायला मिळाली आहे. आरव्हीएनएल शेअरने २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेतला होता. आरव्हीएनएल शेअरमध्ये दैनंदिन चार्टवर आयताकृती पॅटर्न तयार होत आहे. रिस्क रिवॉर्डच्या बाबतीत आरव्हीएनएल शेअर खूपच आकर्षक दिसत असल्याचं तेजस शाह यांनी म्हटलं आहे.
आरव्हीएनएल शेअर टार्गेट प्राईस
आरव्हीएनएल शेअर साप्ताहिक तसेच मासिक चार्ट सेटअप देखील मजबूत दिसत आहे. तेजस शाह यांनी आरव्हीएनएल शेअरसाठी ५०० ते ५३५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ४२० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. पुढील ३-६ महिन्यांत आरव्हीएनएल शेअर ही टार्गेट प्राईस गाठू शकतो असं तेजस शाह यांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.