
RVNL Share Price | आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात विशेषतः शिपिंग, डिफेन्स आणि रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आगामी अर्थसंकल्पापूर्वी मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने जून 2024 या महिन्यात आरव्हीएनएल कंपनीचे 64.81 लाख शेअर्स 270 कोटी रुपये मूल्यावर विकले होते. जून तिमाहीच्या शेवटी मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने आरव्हीएनएल कंपनीचे 0.09 टक्के भागभांडवल धारण केले होते. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 3.73 टक्के घसरणीसह 597 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तथापि, दुसरीकडे, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इतर दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामधे टीटागढ रेल सिस्टीम आणि टेक्समॅको रेल या दोन कंपन्या सामील आहेत. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने टीटागड रेल्वे कंपनीमध्ये 430 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. नुवामा ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार कोटक म्युच्युअल फंडने टीटागढ रेल कंपनीचे 38000 शेअर्स 7 कोटी रुपये मूल्यावर विकले आहेत. याशिवाय जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडने टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे 38.89 लाख शेअर्स 89 कोटी रुपये मूल्यावर विकले आहे.
आरव्हीएनएल कंपनीने मागील 12 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 421 टक्के नफा कमावून दिला आहे. तर टीटागढ रेल कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 213 टक्के नफा कमवून दिला आहे. जून महिन्यात म्युच्युअल फंडांनी भारतीय इक्विटी मार्केटमध्ये 28200 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. तर दुसरीकडे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 24100 कोटी रुपये गुंतवणूक केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.