
RVNL Share Price | आरव्हीएनएल या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 342.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 374 रुपये किमतीवर पोहचला होता.
शुक्रवारी (24 May 2024) या स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.64 टक्के घसरणीसह 369.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील पाच दिवसांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 33.26 टक्के वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 166.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 369.60 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 103.08 टक्के परतावा कमवून दिला आहे. 23 मे 2023 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 113 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 227.08 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी दोन वर्षांपूर्वी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, ते आता मालामाल झाले आहेत.
13 मे 2022 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 31.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. याकाळात शेअर्सची किंमत 1130 टक्के वाढली आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत आरव्हीएनएल स्टॉक 1250 टक्के वाढला आहे. 24 मे 2019 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 25.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर हा स्टॉक 1,343.75 टक्क्यांनी वाढून 369.60 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 374 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 110.60 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.