
RVNL Vs Titagarh Rail Share| टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसात टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 163 रुपये होती.
टिटागड रेल सिस्टीम्स ही कंपनी पूर्वी Titagarh Wagons या नावाने ओळखली जात होती. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉक 15.60 टक्के वाढीसह 969.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील एका वर्षात टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 470 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 168.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 नोव्हेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टिम स्टॉक 994.95 रुपये किमतीवर पोहचला होता. 2023 या वर्षात टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉक आतापर्यंत 315 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 227.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता हा स्टॉक 994.95 रुपये किमतीवर पोहचला आहे.
मागील 3 वर्षांत टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2100 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 20 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 44.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 नोव्हेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टिम स्टॉक 994.95 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 193 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 330.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 994.95 रुपयेच्या पार गेला आहे. मागील 10 वर्षात टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4500 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.