
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ( सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश )
नुकताच सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने EMC लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण केले आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी सालासर टेक्नो इंजिनियरिंग स्टॉक 1.79 टक्के घसरणीसह 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 22.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने ईएमसी लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी सर्वाधिक बोली लावली आहे. एनसीएलटी, कोलकाता खंडपीठाच्या परवानगीनंतर सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीने ईएमसी लिमिटेड कंपनी ताब्यात घेतली आहे.
सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने ईएमसी लिमिटेड कंपनीचे कंपनीचे अधिग्रहण 178 कोटी रुपयेला केले आहे. ईएमसी लिमिटेड कंपनीचे पूर्वीचे नाव इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड असे होते. 31 मार्च 2023 च्या आकडेवारीनुसार, सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीची वार्षिक उलाढाल 70.70 कोटी रुपये होती. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 14 मार्च 2023 रोजी अप्पर सर्किट लागला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.