
SBFC Finance IPO | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खास ठरणार आहे. या आठवड्यात एकापाठोपाठ एक अनेक कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन केले जात आहेत. यात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. यापैकी एक कंपनी आहे, SBFC फायनान्स. या कंपनीचा IPO 3 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. (SBFC Share Price)
SBFC फायनान्स IPO स्टॉकबाबत ग्रे मार्केट मधून सकारात्मक बातमी आली आहे. SBFC फायनान्स कंपनीच IPO 3 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच आज गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा IPO स्टॉक 7 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
एसबीएफसी फायनान्स कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 54 ते 57 रुपये जाहीर केली आहे. यासह कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 260 शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान 14,820 रुपये जमा करावे लागणार आहे. या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्समध्ये सूचीबद्ध होणार आहे.
SBFC Finance IPO GMP Today
ग्रे मार्केटमध्ये SBFC फायनान्स कंपनीचा IPO जबरदस्त कामगिरी करत आहे. SBFC फायनान्स कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील एका दिग्गज तज्ज्ञांच्या मते जर या शेअरची ग्रे मार्केट किंमत लिस्टिंगपर्यंत टिकुन राहिली, तर हा स्टॉक 100 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या 70 टक्के नफा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.