11 December 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत मोठी बातमी, सुझलॉन शेअरवर नेमका काय परिणाम होणार? अजून फायदा होणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी भांडवली बाजारातील क्वालिफाईड् इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 1,500 ते 1,800 कोटी रुपये भांडवल उभारणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सुझलॉन एनर्जी ही कंपनी ऑगस्ट महिन्यात संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 1,500 ते 1,800 कोटी रुपये भांडवल जमा करण्याची तयारी करत आहे. (Suzlon Energy Share Price)

यासाठी कंपनी आपले शेअर्स विकणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि आपल्या विंड टर्बाइन मेकर व्यवसायाला अधिक बळ देण्यासाठी कर्जाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शुक्रवारी (04 ऑगस्ट 2023) सुझलॉन एनर्जीचा शेअर 3.06% वधारून 18.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी हा पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीची स्थापना दिवंगत उद्योजक तुलसीदास तंती यांनी केली होती. या टर्बाइन मेकर कंपनीने आपल्या आयुष्यात कर्ज पुनर्रचनेच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. 2020 मध्ये कंपनीने आपल्या 13,000 कोटी पेक्षा जास्त कर्जाची परतफेड करून कंपनीला काही अंशी कर्जमुक्त केले होते. 2020 पासून पुनर्रचना, प्रवर्तक भांडवल गुंतवणूक, आणि राइट्स इश्यूद्वारें सुझलॉन एनर्जी कंपनीने 30 जून 2023 पर्यंत 1,806 कोटी रुपये कर्ज परतफेड केली आहे. आणि 1,297 कोटीची सकारात्मक निव्वळ संपत्ती बनवली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनी सध्या भारतातील दिग्गज गुंतवणूक बँक ICICI सिक्युरिटीज सोबत पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार प्लेसमेंटबाबत बोलणी करत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी ऑगस्ट महिन्यात यासंबंधित करार करणार आहे. कंपनी QIP साठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि गुंतवणुकदारांना संपर्क करत आहे.

आज सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर कालच्या ट्रेडिंगमध्ये देखील 4.40 टक्के घसरणीसह 18.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 97.79 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांना 67.29 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 174.54 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 03 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x