SBI Amrit Kalash FD Scheme | एसबीआय बँकेची विशेष FD स्कीम, मिळेल मजबूत व्याज, सर्व फायदे जाणून घ्या

SBI Amrit Kalash FD Scheme | देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय’ने पुन्हा एकदा ‘अमृत कलश’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जातेय. बँकेने ही विशेष एफडी योजना 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली. कारण ही 31 मार्च 2023 पर्यंतच सुरु राहणार होती. मात्र आता ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही 400 दिवसांची FD आहे. अमृत कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोन सुविधा देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच त्याचे सर्व फायदे समजून घ्या.
कालावधी ४०० दिवसांचा
एसबीआयने नुकतेच आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे, ज्यानुसार घरगुती (देशातील) आणि एनआरआय ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर, 400 दिवसांचा कालावधी आणि इतर अनेक फायद्यांसह अमृत कलश ठेव योजना सादर करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी अटी व शर्तीही लागू आहेत आहेत असे म्हटले आहे.
एसबीआय अमृत कलश डिपॉझिटचा व्याजदर किती आहे?
एसबीआय अमृत कलश डिपॉझिट योजनेचा व्याजदर वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळा आहे. नियमित नागरिकांसाठी व्याजदर ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के आहे. त्याचप्रमाणे एसबीआय पेन्शनर आणि कर्मचाऱ्यांसाठी व्याजदर 1 टक्के अतिरिक्त ठेवण्यात आला आहे. या ठेव योजनेचा एकूण कालावधी ४०० दिवसांचा आहे.
विशेष खाते उघडावे लागेल
एसबीआय अमृत कलश डिपॉझिट योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांना आपला निधी किमान ४०० दिवस जमा ठेवावा लागेल. एसबीआय अमृत कलश डिपॉझिट योजनेचा कालावधी 12 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 पर्यंत असेल. 30 जून 2023 पर्यंत तुम्ही केव्हाही अर्ज करू शकता. एसबीआय अमृत कलश डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय अमृत कलश खाते उघडावे लागेल किंवा एसबीआय योनो अॅपद्वारे गुंतवणूक करावी लागेल.
हे कोणासाठी फायद्याचे?
एसबीआय अमृत कलश डिपॉझिट स्कीम अशा व्यक्तींसाठी चांगली आहे ज्यांना 1 ते 2 वर्षांसाठी आपले पैसे गुंतवायचे आहेत. एसबीआय अमृत कलश डिपॉझिट स्कीम अंतर्गत ही प्रीमॅच्युअर लोनची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिले जाणार आहे. उदाहरणार्थ, जर त्यांनी या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 400 दिवसांनंतर त्यांना 8,600 रुपये व्याज मिळेल.
व्याजदरात वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच मुदत ठेवी (एफडी) आणि रिकरिंग डिपॉझिट (आरडी) च्या व्याजदरात वाढ केली आहे, ज्यांचा मॅच्युरिटी कालावधी 7 दिवसते 10 वर्षांपर्यंत आहे. सामान्य नागरिकांना ३ ते ६.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० ते ७.५० टक्के दराने व्याज मिळणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: SBI Amrit Kalash FD Scheme interest rate benefits check details on 15 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल