
SBI Amrit Kalash FD Scheme | जर तुम्ही नुकतीच एफडी किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँकेची विशेष एफडी योजना अमृत कलश डिपॉझिट स्कीम या महिन्यात संपणार आहे. एसबीआय अमृत कलश ही 400 दिवसांची एफडी आहे.
सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या फायद्याची
यामध्ये सामान्य ग्राहकांना 7.1 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. एसबीआय च्या शाखेत जाऊन किंवा नेट बँकिंग आणि एसबीआय योनो अॅपद्वारे ग्राहक एसबीआय अमृत कलश एफडी बुक करू शकतात. एसबीआयच्या या खास अमृत कलश निवेश योजनेत तुम्ही 15 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता.
व्याज कसं दिलं जातं?
या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही तत्त्वावर व्याज दिले जाईल. एफडीच्या मॅच्युरिटीवरील टीडीएस कापून त्यावरील व्याज ग्राहकाच्या खात्यात पाठवले जाईल. यामध्ये प्राप्तिकर नियमानुसार टीडीएस आकारला जाणार आहे. गुंतवणूकदार आयटी नियमांनुसार कर वजावटीपासून सूट मिळवण्यासाठी फॉर्म 15G/15H वापरू शकतात.
या एफडी’चे व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सर्वसामान्य नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3% ते 7% व्याज देते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून ३.५०% ते ७.५०% दरम्यान व्याज दिले जाते.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.