 
						SBI FD Interest Rates | मुदत ठेव ठेवताना प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज दर मिळावा अशी इच्छा असते. प्रत्येक बँक एफडीवर वेगवेगळे व्याजदर देते. याशिवाय तुम्ही किती काळासाठी एफडी करत आहात यावरही व्याजदर अवलंबून असतो.
उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एफडी केल्यास तीन महिन्यांच्या एफडीवर व्याजदर 5.5 टक्के असतो, तर 1 वर्षाच्या एफडीवर तो 6.8 टक्क्यांपर्यंत वाढतो. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप बँका 5 वर्षांच्या एफडीवर देत असलेल्या व्याज दरांबद्दल सांगणार आहोत.
एसबीआय बँक :
स्टेट बँक ऑफ इंडिया पाच वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज दर देत आहे. हे दर 15 मे 2024 पासून लागू होणार आहेत.
बँक ऑफ बडोदा :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.50 टक्के आणि एक वर्षाच्या एफडीवर 6.85 टक्के व्याज देते. हे दर 15 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत.
पंजाब नॅशनल बँक :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर (एफडी) 6.55 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 12 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत.
आयसीआयसीआय बँक :
खासगी बँक पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के व्याज देत आहे. हे दर १७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
एचडीएफसी बँक :
खासगी क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँक पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.6 टक्के व्याज देत आहे. हे दर 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत.
कोटक महिंद्रा बँक :
खासगी क्षेत्रातील ही बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.20 टक्के तर एक वर्षाच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज देत आहे. हे दर 27 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		