
SBI FD investment | भारतातील एफडी हा गुंतवणुकीचा एक खूप चांगला पर्याय मानला जातो. कोविडनंतर गुंतवणूक योजनावरील व्याजदर पुन्हा वाढू लागले आहेत, त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एफडीकडे पैसे टाकण्यासाठी वळत आहेत. पण एफडीच्या अनेक फायद्यांसोबतच एक मोठा तोटा देखील आहे. तुम्ही FD मधून मुदतीपूर्वी पैसे काढू शकत नाही. जर तुम्हाला एफडी तोडायची असेल तर बँक तुमच्या FD वर दंड आकारते. पण तुम्हाला माहित आहे का? अशा काही खास योजना आहेत ज्यात FD मुदतीपूर्वी मोडली तरी तुम्हाला कोणताही दंड आकारला जात नाही. येथे आम्ही तुम्हाला SBI च्या अशाच एका मुदत ठेव योजनाबद्दल माहिती देणार आहोत.
एसबीआय मल्टी ऑप्शन ठेव योजना :
भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एक विशेष FD योजना राबवते. ही मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम आहे. याला SBI MODS असेही म्हणतात. जर तुम्ही या एफडी योजनेत गुंतवणूक केली आणि मुदतीपूर्वी पैसे काढून घेतले तर तुमच्याकडून कोणतेही दंड शुल्क घेतले जाणार नाही.
योजनेची संपूर्ण माहिती :
एसबीआयच्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची संपूर्ण माहिती हवी. ही मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी योजना आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एफडी थेट तुमच्या बचत आणि चालू खात्यांसोबत जोडली जाते. ही मुदत ठेव योजना सामान्य एफडीपेक्षा खूप वेगळी असल्याने, तुम्ही हवे तेव्हा कधीही त्यातून पैसे काढू शकता. त्यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवे तेव्हा कधीही पैसे जमा करू शकता.
व्याज दर काय आहे :
एसबीआय आपल्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूकदारांना साधारण मुदत ठेव योजनेप्रमाणेच व्याज परतावा देते. सामान्य एफडीप्रमाणे यामध्येही ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज मिळते. एसबीआयच्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीममध्ये एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवा तो कालावधी निवडू शकता.
पैसे काढण्याची पद्धत :
SBI च्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम अंतर्गत गुंतवलेले पैसे 1000 रुपयेच्या पटीत कितीही वेळा काढता येतात. बँकेने यासाठी कोणतीही मर्यादा ठरवली नाही. तुम्ही तुमचे पैसे उपलब्ध सर्व मार्गांनी काढू शकता, त्यात एटीएम, चेकबुक आणि शाखेतून पैसे काढणे यांचा समावेश आहे. या योजनेत तुम्हाला ऑटो स्वीप सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्हाला एसबीआयच्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीममध्ये ऑटो स्वीप सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर या योजनेची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. तुम्ही ही मुदत ठेव योजना तुमच्या बचत खात्याशीही लिंक करू शकता.
* SBI व्याज दर 7 दिवस ते 45 दिवस :
सामान्य लोकांसाठी – 2.90 टक्के;
* ज्येष्ठ नागरिकांसाठी – 46 दिवसांपासून ते 179 दिवसांपर्यंत 3.40 टक्के.
सर्वसामान्यांसाठी – 3.90 टक्के;
* ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.40 टक्के 180 दिवस ते 210 दिवस
सर्वसामान्यांसाठी – 4.55 टक्के;
* ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.05 टक्के 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी
सर्वसामान्यांसाठी – 4.60 टक्के;
* ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.10 टक्के 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी
सामान्य लोकांसाठी – 5.45 टक्के;
* ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.95 टक्के 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी
सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के;
* ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.00 टक्के 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी
सामान्य लोकांसाठी – 5.60 टक्के;
* ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 वर्षे ते 10 वर्षे 6.10 टक्के सर्वसामान्यांसाठी – 5.65 टक्के
ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.15 टक्के
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.