
SBI FD Vs Post Office | आजही गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर बहुतांश लोक मुदत ठेवींची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, गॅरंटीसह. यात सेव्हिंग अकाउंट्सपेक्षा जास्त रिटर्न मिळतात. देशातील आघाडीच्या बँका एसबीआय आणि पोस्ट ऑफिस ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे पर्याय देत आहेत. मात्र, गुंतवणूकदारांनी एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी व्याजदरांची तुलना करणे अत्यंत गरजेचे आहे.
एसबीआय एफडी दर :
एसबीआयने शेवटचे 14 जून 2022 रोजी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केले होते. या सुधारणेनंतर बँक आता सर्वसामान्य नागरिकांसाठी २.९० ते ५.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.४० टक्क्यांपासून ६.३० टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे.
* 7 दिवस ते 45 दिवस – 2.90 टक्के
* 46 दिवस ते 179 दिवस – 3.90%
* 180 दिवस ते २१० दिवस – ४.४० टक्के
* 211 दिवसांपेक्षा कमी ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.60%
* 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी – 5.30%
* 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी – 5.35%
* 3 वर्षांपेक्षा कमी ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी – 5.45%
* ५ वर्षे ते १० वर्षे – ५.५० टक्के
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याजदर :
बँकांशिवाय पोस्ट ऑफिसमध्येही एफडी मिळू शकते, ज्याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणतात. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटमध्ये तुम्ही 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षांचा कालावधी असलेल्या टाइम डिपॉझिटवर 5.5 टक्के व्याज मिळतं. मात्र 5 वर्षे गुंतवणूक केल्यास ठेवीदारांना 6.7 टक्के व्याज मिळते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.