
Seamec Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील बँकिंग सेक्टर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ व्हायला सुरुवात झाली आहे. 1-2 बँका आर्थिक अडचणीमध्ये अडकल्यावर इतर बँकावरही त्याचा ताण पाहायला मिळत आहे. याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. सलग मार्केट कमजोर कामगिरी सह क्लोज होत होता. आज मात्र शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. (Seamec Ltd)
अशा तेजीत काही स्टॉक कमालीचा प्रतिसाद देतात. हे शेअर्स जितक्या तेजीत पडतात, तितक्या तेजीत त्यात सुधारणा देखील होते. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी ‘सीमेक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 820.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे, कंपनीला नवीन कंत्राट मिळाले आहे. ‘सीमेक लिमिटेड’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला नुकताच पाइपलाइन बदलण्याच्या प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. या कराराचे एकूण मुख्य जीएसटीसह 80,77,70,90,775 रुपये आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला मे 2024 पर्यंतच कालावधी देण्यात आला आहे.
शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीनंतर ‘सीमेक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 36.48 टक्के वाढले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20.41 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 27.21 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. ‘सीमेक लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1424.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 564.85 रुपये प्रति शेअर होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.