
Senior Citizen Savings Scheme | अनेकांना गुंतवणूक करायची असते, पण असुरक्षित गुंतवणुकीच्या भीतीने ते आपले पैसे गुंतवू शकत नाहीत. आज आम्ही 60 वर्षांवरील लोकांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि जास्त परतावा असलेल्या काही मुदत ठेव योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्या 5 वर्षांच्या कालावधीत पूर्ण होतात. तसेच 8.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे. हे व्याजदर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू आहेत.
‘या’ बँकांवर सर्वाधिक व्याजदर
* सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 8.75 टक्के व्याज देत आहे.
* युनिटी स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 8.65 टक्के व्याज देत आहे.
* उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 8.35 टक्के व्याज देत आहे.
* एयू स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.
* इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.
* याव्यतिरिक्त जन स्मॉल फायनान्स बँक देखील 5 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या आपल्या एफडीवर 7.75% व्याज देत आहे.
* उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 7.7 टक्के व्याज देत आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणे महत्वाचे
ज्येष्ठ नागरिकांना ऍक्ट 80TTB अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते. ही वजावट बँक एफडीसह विविध स्त्रोतांमधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर लागू होते. तसेच बँका, टपाल कार्यालये आणि बँकिंग सहकारी संस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवींच्या एकूण व्याज उत्पन्नाची मर्यादा म्हणजे 50,000 रुपयांपर्यंतची ही वजावट.