21 January 2025 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरामधून 'कोकण हार्टेड गर्लची' एक्झिट; इतर सदस्यांना झाले अश्रू अनावर

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू होती. अशातच शनिवार आणि रविवारमध्ये होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर घराबाहेर निघण्याच्या प्रक्रियेमध्ये सज्ज झालेल्यांपैकी एका सदस्याला घराची एक्झिट घ्यावी लागते. या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरून कोकण हार्टेड गर्ल अंकिता हिने घराचा निरोप घेतला आहे. दरम्यान अंकीता एवढ्या लवकर घराचा निरोप घेईल असं प्रेक्षकांना आणि घरातील सदस्यांना वाटलं नव्हतं. परंतु बिग बॉसचा हा खेळ ट्विस्ट आणि धक्के देणारा आहे.

रितेशने घराबाहेर जाण्यासाठी अंकिताचं नावं घेतल्याबरोबर सर्वच सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर अंकीता तिच्या नावाची पाटी घेऊन घराबाहेर पडली. दरम्यान सर्व सदस्यांसह धनंजय आणि सूरज या दोघांना अश्रू अनावर झाले. सोबतच अंकीता देखील भाऊक झाल्याची दिसत होती. अंकिताचे हावभाव पाहून तिला अजून बीबिंच्या घरामध्ये राहायचं होतं अशी भावना तिच्या चेहेऱ्यावर दिसून येत होती.

Bigg Boss Marathi Konkan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar

बिग बॉसचा दरवाजा उघडला आणि अंकिता समोर एका वाक्याची पाटी आधीपासूनच उभारली होती. त्या पाठीवर असं लिहिलं होतं की, ” इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतः चांगलं खेळा. अपेक्षा आहेत. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात…!”. दरम्यान रितेश यांनी असं सांगत जाहीर केलं की, या आठवड्याच्या वोटिंग लाईन्स बंद केल्या गेल्या होत्या. त्यामुळे या आठवड्यात एलीमिनेशन होणार नाही. अंकिता आता आपल्या सोबत घरात राहणार हे समजतात अंकिताचे परममित्र धनंजय यांच्या पोटात आनंद मावेनासा झाला.

अशातच बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांचा सर्वात लाडका शो ठरला आहे. प्रत्येकजण शनिवार-रविवारचा भाऊचा धक्का पाहण्यास प्रचंड उत्सूक असतात. हा शो दिवसेंदिवस रंजक वळणावर चालत असल्याने प्रेक्षकांनी शोला चांगलचीच पसंती दर्शवली आहे. अशातच वाईल्ड कार्ड एन्ट्री नेमकी कोण घेणार ही चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरूच आहे. कोणी राखी सावंत तर कोणी अभिजीत बीचुकले यांचं नाव घेत बिग बॉस वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा करत आहे. त्यामुळे सर्वच प्रेक्षकवर्ग वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा सदस्य पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Bigg Boss Marathi Konkan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar 2

News Title : Bigg Boss Marathi Konkan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Exit 02 September 2024.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x