
Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज शेअर बाजारात तेजीच्या दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. शनिवारी या कंपनीचे शेअर्स 84.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 84.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सर्व्होटेक पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1870 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 107.55 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 39.85 रुपये होती. मागील एका वर्षात सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षांत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 2.52 रुपयेवरून 3270 टक्के वाढली आहे. सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शनिवार दिनांक 18 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी 15 लाख वॉरंटचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
6 जानेवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने गुंतवणुकदारांना 15 लाख परिवर्तनीय वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली होती. आता हे 15 लाख वॉरंट 15 लाख इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर केले जाणार आहेत. या वॉरंटच्या बदल्यात प्रमोटर्स आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांना प्रेफरंस शेअर्स वाटप केले जाणार आहेत. सर्व्होटेक पॉवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे 29 लाख वॉरंटचे शेअर्समध्ये रूपांतरण करणे प्रलंबित आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.