
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स या कंप्रेसर, पंप, डिझेल इंजिन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 1108.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत.
शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, शक्ती पंप कंपनीला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कंपनीकडून 50,000 पंप पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी शक्ती पंप्स स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 1,164.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एका दिवसात 184.70 रुपये वाढले होते. शक्ती पंप्स कंपनीने नुकताच सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड कंपनीकडून 50000 ऑफ ग्रीड सोलर फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी एम्पॅनलमेंट पुरवण्याचे 1603 कोटी रुपये मुल्यांची ऑर्डर मिळाली आहे.
हे पंप पीएम कुसुम योजनेच्या फेज -3 मधील घटक-ब अंतर्गत महाराष्ट्रात पुरवले जाणार आहेत. शक्ती पंप्स कंपनीला ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 24 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मागील महिन्यात शक्ती पंप्स कंपनीला कुसुम-3 योजने अंतर्गत हरियाणा अक्षय ऊर्जा विभागकडून 358 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती.
शक्ती पंप कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 154 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 436.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1108.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2023 या वर्षात शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 173 टक्के वाढवले आहेत. मागील एका महिन्यात शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 टक्के मजबूत झाली आहे. या कंपनीच्या शेअर्स 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1108.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 380.15 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.