
Shilchar Technologies Share Price Today | ‘सिलचर टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2600 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षात 77 रुपयांवरून वाढून 2100 रुपयांवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात ‘सिलचर टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 247 टक्के नफा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2250 रुपये होती. तर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 469.50 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.071 टक्के घसरणीसह 2,111.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
3 वर्षांत 1 लाखावर दिला 27 लाख परतावा :
सिलचर टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 1 एप्रिल 2020 रोजी 77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2136.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. सिलचर टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2675 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 एप्रिल 2020 रोजी सिलचर टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 27.79 लाख रुपये झाले असते.
1 वर्षात 247 टक्के परतावा :
‘सिलचर टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 247 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 614.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 मे 2023 रोजी हा स्टॉक 2136.50 रुपये किमतीवर पोहचला आहे. त्याच वेळी, सिलचर टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स या वर्षी 118 टक्के मजबूत झाले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी रोजी हा स्टॉक 979.30 रुपये किमतीवर पोहचला होता. सिलचर टेक्नॉलॉजीज कंपनीचे बाजार भांडवल 814 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 68.28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीचा एकूण निव्वळ नफा 11.89 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.