
Shubham Polyspin Share Price Today | गेल्या एक महिन्यापासून ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत धावत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 43.76 टक्के वाढले आहेत. 27 मार्च 2023 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 26.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के घसरणीसह 25.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 14.59 रुपये होती. (Shubham Polyspin Limited)
शेअरची वाटचाल :
‘शुभम पॉलिस्पिन कंपनीच्या शेअर्सवर मागील बऱ्याच काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 33 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. 22 ऑगस्ट 2022 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 286.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.59 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शुभम पॉलिस्पिन कंपनीचे बाजार भांडवल 32.11 कोटी रुपये आहे. मार्च 2023 तिमाहीच्या नवीनतम शेअरहोल्डिंग डेटानुसार ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीमध्ये 72.78 भाग भांडवल धारण केले आहेत.
‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीने मागील 3 वर्षात 2 वेळा आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. या कापड कंपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये 1 : 1 च्या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. आणि सप्टेंबर 2022 मध्ये या कंपनीने 1 : 10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर जारी केले होते.
या कंपनीने प्रत्येक 10 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत दिला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत, ‘शुभम पॉलिस्पिन’ स्मॉलकॅप कंपनीने 11.01 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यात कंपनीने 25 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.