22 May 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, कंपनीबाबत सकारात्मक बातमी आली

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पॉवर लिमिटेड स्टॉक मध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.85 टक्के वाढीसह 254.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Adani Power Share Price Today)

या स्टॉकमध्ये अचानक इतकी तेजी येण्याचे कारण म्हणजे, अदानी पॉवर कंपनीने झारखंड राज्याच्या गोड्डा जिल्ह्यात ऊर्जा निर्मिती प्लांटचे व्यावसायिक ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी अदानी पॉवर लिमिटेड स्टॉक 1.12 टक्के वाढीसह 253.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ज्ञांचे मत

भारतातील काही दिग्गज ब्रोकरेज फर्मने अदानी पॉवर कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी अदानी पॉवर स्टॉकवर 300 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

मागील पाच वर्षात अदानी पॉवर कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1,450.77 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 16.15 रुपयांवरून वाढून 253 रुपयेवर पोहचली आहे.

गुंतवणुकीवर परतावा

YTD आधारे अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 15.01 टक्के घसरली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 7.05 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. सोमवारी अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने स्टॉक फाइलिंगमध्ये कमावले आहे की, कंपनीने झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात 800 मेगावॅट क्षमतेच्या 2×800 मेगावॅट क्षमतेच्या अल्ट्रा-सुपरक्रिटिकल पॉवर युनिटचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x