
Sigachi Industries Share Price | सिगाची इंडस्ट्रीज या फार्मा आणि कॉस्मेटिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. या कंपनीची स्थापना 1989 साली झाली होती. सिगाची इंडस्ट्रीज कंपनी अल्पावधीतच मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज उत्पादनच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. सिगाची इंडस्ट्रीज या कंपनीची मुख्य उपस्थिती तेलंगणा आणि गुजरात राज्यात आहे. या ठिकाणाहून ही कंपनी जगभरातील ग्राहकांना सेवा प्रदान करण्याचे काम करते.
सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचे ग्राहक जगभरात आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्व देशांमध्ये पसरले आहेत. सिगाची इंडस्ट्रीज या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करून आर्थिक कामगिरीची माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, सिगाची इंडस्ट्रीज कंपनीने 8 टक्क्यांच्या वाढीसह 85 कोटी रुपये विक्री साध्य केली आहे. यासोबतच सिगाची इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिगाची इंडस्ट्रीज कंपनीने जून 2023 तिमाहीत 12.87 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. नुकताच सिगाची इंडस्ट्रीज कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स दहा तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटनंतर शेअरची दर्शनी किंमत 1 रुपयेवर येईल. कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र कंपनीने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा 7 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केली आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरणीसह 345 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सिगाची इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 36 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.