 
						Bank and SIM Rules | ऑनलाइन व्यवहार आता वाढत चालले आहेत. नागरिक अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्सचा पर्याय निवडत आहेत. यात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन पध्दतिने उपलब्ध असल्याने याकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सिमकार्ड खरेदी आणि बॅंक खाते खोलण्यासाठी काही नियम बदलले जाणार आहेत.
यात शासनामार्फत काही कठोर नियम सुरु करण्याची शक्यता आहे. यात सिम कार्ड खरेदी करणारी आणि बॅंक खाते खोलणारी व्यक्ती यांच्या विषयीची सर्व माहिती मिळवता येईल या अनुशंगाने नियम बनवण्याचा विचार केला जात आहे. बॅंकिग आणि सिम खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. नविन नियम लागू केल्यास याला आळा घालण्यास मदत होईल.
सरकारी योजना आहे तरी काय?
* CNBC ने यासाठी एक रिपोर्ट जारी केला आहे. यात येणा-या काळात टेलिकॉम ऑपरेटर्स आणि बॅंक यांना प्रतक्ष पडताळणीचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी नविन बॅंक खाते उघडणा-यांसाठी पडताळणी केवायसी मार्फत केली जाते. यात खातेदारकाचे सर्व तपशील तपासले जातात. मात्र अनेक कंपनी खाती ही फक्त इन्कॉपोरेशन सर्टिफिकेट नुसार खुली करता येतात.
* गेल्या वर्षभरात फसवणूकीचे प्रमाण खुप वाढत चालले आहे. याचे कारण म्हणजे कोणालाही सिम कार्ड सहज मिळणे आणि बॅंक खाते देखील सहज खोलता येणे हे आहे. त्यामुळे फसवणूक मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशात RBI ने जारी केलेल्या माहिती नुसार साल २०२१-२२ मध्ये बॅंकेतील फसवणूक झालेली रक्कम ४१,००० केटी रुपये एवढी आहे.
* त्यामुळेच आता RBI आणि सरकारने बॅंक खाती खोलण्यासाठी नियम अधीक कठीण बनवले आहेत. यात केवायसीची सक्ती करण्याचा विचार सुरु आहे. तसेच टेलिकॉमसाठी देखील लवकच नविन नियावली जाहिर होत आहे. सध्या गृह मंत्रालय वित्त आणि टेलीकॉम मंत्रालयासह या संदर्भात एक बैठक पार पडली. त्यात देखील आगामी बदलांवर चर्चा करण्यात आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		